येस न्युज मराठी नेटवर्क : टूलकिट प्रकरणात २२ वर्षांच्या दिशा रवीला अटक करण्यात आल्यानंतर त्यावरून दिल्ली पोलिसांना लक्ष्य केले जात होते. . त्याविषयी बोलताना अमित शहांनी दिल्ली पोलिसांचे समर्थन केले आहे. ‘दिल्ली पोलीस या प्रकरणाचा योग्य पद्धतीने तपास करत आहेत. गुन्हा किंवा गुन्हेगार ठरवण्यामध्ये संबंधित व्यक्तीचं वय, लिंग किंवा व्यवसाय महत्त्वाचा कसा ठरू शकतो? या घटकांवरून गुन्ह्याचं स्वरूप कसं ठरवता येईल?’ असा सवाल शहांनी उपस्थित केला आहे. दिशा रवीच्या वयामुळे दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर टीका केली जात आहे.शेतकरी आंदोलनाच्या आडून कट-कारस्थान करण्यासाठीच्या कथित टूलकिट प्रकरणावरून गेल्या काही दिवसांपासून देशातले राजकारण ढवळून निघाले आहे. स्वीडीश पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिने हे टूलकिट ट्वीट केल्यानंतर हा वाद सुरू झाला. हे टूलकिट २६ जानेवारीला राजधानी दिल्लीत झालेल्या हिंसाचारासाठीची पूर्वतयारी होती असा संशया आहे.