येस न्युज मराठी नेटवर्क ; महाराष्ट्रात अनेक थोर राजे महाराजे होऊन गेलेत. त्यापैकी एक महान योद्धा, राजा म्हणजेच श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी शहाजीराजे भोसले. छत्रपती शिवराय लहानपणापासूनच स्वराज्य मिळावा यासाठी आपल्या आई जिजाऊकडून युध्दाचे, शस्त्र अभ्यासाचे धडे घेऊन लहान वयातच महाराष्ट्रात स्वराज्याची स्थापना केली. पुढे मोठे झाल्यावर त्यांना ‘छत्रपती’ ही उपाधी मिळाली.
सध्या कोरोना महामारीमुळे कोठेही शिवजयंती मोठया थाटात साजरी करण्यावर बंदी असली तरी त्यांच्यावरचे प्रेम हे काही लपत नाही. यंदा 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचे 392 वी जयंती. या पावन दिनाचे औचित्य साधून सोलापूरचा साईश्वर केशव गुंटूक याने छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेली झेंडा हातात घेऊन 25.7 किमी अंतर धावत तसेच 76 किमी सायकलिंग करत छत्रपतींना एका वेगळ्या उपक्रमाद्वारे मानवंदना केली. हा झेंडा एकात्मतेचा प्रतीक आहे असा सन्देश स्वयं छत्रपतींनी दिले आहे. असे अनेक महान व्यक्तींना आदर्श मानून आपणही कोणत्या तरी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आपले कौशल्य दाखवून द्यावे, हाच संदेश साईश्वर देण्याचा प्रयत्न करत आहे. असा हा आगळावेगळा उपक्रम राबविणरा साईश्वर सोलापूरातील एकमेव खेळाडू असून त्यास सायरन्स स्पोर्ट्स भोपाळ (मध्यप्रदेश) चे संस्थापक एस. जी. राहुल यांच्या वतीने शिवरायांची प्रतिमा असलेली पदक प्रदान करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज जसे अनेक गड व किल्ले सर केले तसेच साईश्वरलाही आपल्या भारतासाठी सुवर्ण पदक मिळवून देण्यासाठी ओलीम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करायचे आहे. त्यादृष्टीने साईश्वर दररोज अथक परिश्रम घेत आहे. त्याचाच भाग म्हणून हा एक छोटासा उपक्रम. हे प्रसिद्धीसाठी नव्हे तर इतर अनेकांना प्रेरणा मिळावी यासाठी प्रयत्न करत आहे. आजपर्यंत सोलापूरकरांचे भरभरून प्रेम व प्रोत्साहन मिळत राहिले यापुढेही असेच मिळत राहील. जेणेकरून सोलापूर व भारताचे नाव जगात उज्जवल व्हावे हा एक सार्थ प्रयत्न आहे.
गेल्या 72 वर्षात अथलेटिक्समध्ये ओलीम्पिकचे सुवर्ण पदक भारताला मिळालेले नाही. आज यासाठी संपुर्ण भारतातून प्रयत्न केले जात आहे. तसे आपणही भारताचा झेंडा सातासमुद्रापार न्यावे असे साईश्वरला वाटते.
साईश्वर हा उपक्रम सायकलिंग व रनिंग करत पूर्ण केला आहे. इंडियन मॉडेल स्कुल जुळे सोलापूर ते सीना नदी व सीना नदी ते इंडियन मॉडेल स्कुल जुळे सोलापूरपर्यंत एकूण 76 किमी सायकलिंग पूर्ण केले आहे. तर इंडियन मॉडेल स्कुल ते दयानंद कॉलेज – 8.5 किमी (कंबर तलाव, रेवणसिद्धेश्वर, पत्रकार भवन, स्मार्ट सिटी, जिल्हा न्यायालय, सिव्हील चौक, कन्ना चौक, राजेंद्र चौक, दयानंद कॉलेज, रुपाभवानी), रुपाभवानी ते रेल्वे स्टेशन – 5.2 किमी (सम्राट चौक, कुंभारी वेस, कोंतम चौक, बेगम पेठ, रंगभवन, सात रस्ता, मोदी, रेल्वे स्टेशन)
रेल्वे स्टेशन ते शिवाजी चौक – 6 किमी (रेल्वे स्टेशनपासून दमानी नगर, कोटणीसचे घर, N.G.मिल चाळ मार्गे शिवाजी चौक), शिवाजी चौक ते होम मैदान – 2.7 किमी (चार पुतळा, आंबेडकर पुतळा, भुईकोट किल्ला मार्गे, गणपती घाट, सिद्धेश्वर मंदिर, होम मैदान),
होम मैदान ते शिवस्मारक – 3.3 किमी (जिल्हा परिषद, मार्कंडेय मंदिर, माणिक चौक, मधला मारुती, टिळक चौक पासून नवीपेठ, शिवस्मारक) असे एकूण 25.7 किमी अंतर धावत पूर्ण केले आहे. रनिंग व सायकलिंग असे एकूण 101.7 किमी अंतर 6 तास 32 मिनिटे 38 सेकंदात पूर्ण केले आहे. 25.7 किमी अंतर रनिंगसाठी 2 तास 52 मिनिटे 18 सेकंद तर 76 किमी सायकलिंगसाठी 3 तास 40 मिनिटे 20 सेकंद एवढा वेळ लागला. हा उपक्रम करत असताना सकाळच्या वेळी हलक्या पावसाचे सरी असल्यामुळे वातावरण अनुकूल होता मात्र हातात झेंडा घेऊन धावत असताना खड्डेमय रस्ते आणि ट्राफिकच्या काही अडचणीना सामोरे जावे लागले. असे असले तरी हा प्रवास अत्यंत आनंददायी होता. साईश्वरच्या या उपक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड व वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे.