सोलापूर : चुकीच्या पद्धतीने सरपंच आरक्षण जाहीर केल्याच्या कारणावरून उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सोमवारी आठ तालुक्यातील 22 गावांची सुनावणी घेण्यात आली होती. दरम्यान तक्रारी जास्त असल्यामुळे सरपंचपदाच्या आरक्षणाचे निकाल जाहीर करण्यासाठी न्यायालयाकडून 6 दिवसांची मुदतवाढ जिल्हा प्रशासनाने वाढवून घेतली असून लवकरच 8 तालुक्यातील 22 ग्रामपंचायतिचे सरपंच आरक्षणाचे निर्णय लवकरच घेऊ अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली होती.
सोलापूर जिल्ह्यातील आठ तालुक्यांमधील सरपंच आणि उपसरपंच पदाच्या निवडी 23 फेब्रुवारीला होणार आहेत. सरपंच आणि उपसरपंच पदाच्या निवडी संबंधी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आदेश काढले आहेत. त्यानुसार सरपंच आणि उपसरपंच पदाच्या निवडी 23 फेब्रुवारी रोजी होणार आहेत.