येस न्युज मराठी नेटवर्क : झाय रिचर्डसनवर तब्बल १४ कोटींची बोली,बंगळुरू आणि पंजाब यांच्यात बोलीची चांगलीच रस्सीखेच रंगली होती. अखेर १४ कोटींना रिचर्ड़सन पंजाबच्या संघात गेला. दुसऱ्या सत्रात न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज एडम मिल्न याला मुंबईने ३ कोटी २० लाखांना विकत घेतलं.ऑस्ट्रेलियाचा किपर अलेक्स कॅरी, इंग्लंडचा सॅम बिलिंग्स आणि श्रीलंकेचा अष्टपैलू कुसल परेरा तिघे राहिले UNSOLD,डेव्हिड मलानवर दीड कोटींची बोली : पंजाब किंग्ज संघात दाखल
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज ख्रिस मॉरिस याच्यासाठी ७५ लाखांची होती मूळ किंमत,मॉरिसवर मुंबईने बोली लावली होती पण अखेर IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू म्हणून १६ कोटी २५ लाखांत तो राजस्थानच्या संघात गेला.अष्टपैलू शिवम दुबेसाठी ५० लाखांची होती मूळ किंमत
राजस्थानच्या संघाने ४.४० कोटींच्या रकमेला घेतलं विकत,गेल्या वर्षी बंगळुरू संघात असणारा अनुभवी फिरकीपटू मोईन अली चेन्नईच्या ताफ्यात दाखल झाला. धोनीच्या चेन्नईने त्याला ७ कोटींच्या बोलीला विकत घेतलं.वर्षभराची क्रिकेटबंदी भोगून आलेला अनुभवी शाकिब अल हसन लिलावाच्या मैदानात प्रभावी ठरला.कोलकाताच्या संघाने त्याला ३ कोटी २० लाखांची बोली लावून विकत घेतलं.गेल्या वर्षीच्या IPLमध्ये टीकेचे लक्ष्य ठरलेला मराठमोळा फलंदाज केदार जाधव याला चेन्नईने करारमुक्त केले होते.लिलावादरम्यान त्याच्यावर कोणीही बोली लावली नाही. त्यामुळे तो UNSOLD राहिला.पंजाब संघाने ग्लेन मॅक्सवेलसाठी चेन्नई आणि बंगळुरू यांच्यात रंगलेल्या स्पर्धेत अखेर १४.२५ कोटींना बंगळुरूने त्याला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले.
२ कोटी २० लाखांच्या किमतीला स्टीव्ह स्मिथ दिल्लीच्या संघात दाखल,चीन आणि भारत यांच्यातील सीमारेषेवरील तणाव पाहता गेल्या वर्षी वादाचा मुद्दा ठरलेल्या चिनी कंपनी VIVO ला यंदा पुन्हा स्पर्धेचे प्रायोजकत्व देण्यात आलं आहे.