येस न्युज मराठी नेटवर्क । छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ या मालिकेतील प्रत्येक पात्र हे कामय चर्चेत असते. पण सर्वात जास्त चर्चा रंगतात त्या जेठालालच्या. मालिकेत जेठालाल हे पात्र दिलीप जोशी साकारत आहेत. जेठालालचे शर्ट हे कायमच चर्चेत असतात. मालिकेत जेठालालचे शर्ट हे थोडे हटके असल्याचे पाहायला मिळते. बऱ्याच वेळा मालिकेत या विषयी चर्चा सुरु असल्याचे पाहायला मिळते. पण तुम्हाला माहिती आहे का जेठालालचे हे शर्ट कोण डिझाइन करतं?
गेल्या १३ वर्षांपासून मुंबईमध्ये राहणारे जीतू भाई लखानी जेठालालचे शर्ट डिझाइन करत आहेत. त्यांनी एका मुलाखतीमध्ये जेठालालचे शर्ट डिझाइन करण्यास विशेष मेहनत घेत असल्याचे सांगितले आहे. तसेच हे शर्ट डिझाइन करण्यासाठी जवळपास २ ते ३ तास लागत असल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. दिलीप जोशी आणि आसिद मोदी यांना जीतू यांनी डिझाइन केलेले शर्ट प्रचंड आवडतात. जेठालालचे शर्ट पाहून अनेक जण जीतू यांच्याकडे तसे सेम शर्ट शिवण्यासाठी येत असल्याचे देखील त्यांनी मुलाखतीमध्ये सांगितले आहे.