सोलापूर । हुतात्मा दिनी 23 मार्च रोजी देशभरातील पंधराशे ठिकाणी निमा संघटनेतर्फे रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांमध्ये एकाच दिवसात 90 हजार रक्त पिशव्या गोळा करण्याचा संकल्प निमा संघटनेने केला आहे.भीमा संघटनेच्या सोलापूर शाखेचे अध्यक्ष डॉक्टर रुपेश एडके यांनी सांगितले की, सोलापुरात प्रजापिता ब्रह्माकुमारी वैद्यकीय शाखा बीटीसी ,भारतीय रेड क्रॉस सोसायटी , हरियाणा चेंबर ऑफ कॉमर्स आदी संघटना या देशव्यापी रक्तदान शिबिराच्या संकल्पात सहभागी होत आहेत. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी या सर्व संघटना प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले.