येस न्युज मराठी नेटवर्क : नेहरूनगर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज माध्यमिक आश्रम प्रशालेत संत सेवालाल जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.मुख्याध्यापिका अश्विनी चव्हाण व पर्यवेक्षक हराळे यांनी पुष्पहार अर्पण करून संत सेवालाल यांची माहिती आश्रम शाळेतील मुलांना दिली. यावेळी जिल्हास्तरीय वुशू स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणाऱ्या तुषार गायकवाड आणि राजरत्न माने यांचा सत्कार करण्यात आला.
