सोलापूर । शिवजयंती २०२१ निमित्त घोंगडे वस्ती येथील मैदानावर या टेनिस बॉल स्पर्धेचे आयोजन जय भवानी प्रतिष्ठान आणि हिंदू श्री संदीप महाले मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून स्पर्धा सुरुवात करण्यात आली . या स्पर्धेचा पहिला सामना श्रमिक पत्रकार संघ विरुद्ध संदीप महाले मित्रपरिवार या संघात सामना खेळविण्यात आला. श्रमिक पत्रकार संघाचे कर्णधार सागर सुरवसे यांनी नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत प्रतिस्पर्धी संघाला अवघ्या 53 धावत धावत गुंडाळले. श्रमिक पत्रकार संघाने हा सामना अवघ्या पाच षटकात संपविला…
यावेळी शहर काँग्रेस अध्यक्ष प्रकाश वाले, ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील, संजय कोळी, माजी नगरसेवक जगदीश पाटील, संजय होमकर, चन्नवीर चिट्टे ,श्रीराम युवासेनेचे अध्यक्ष राजकुमार पाटील, संजय कणके, पिंटू महाले, देवा बुधवतराव, संजय साळुंखे, अमर बिराजदार ,बिपीन पाटील मनोज मलकुनाईक आदींची प्रमुख उपस्थिती होती…
यंदा शिवजयंतीच्या मिरवणुकीचा खर्च टाळून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तसेच मागील वर्षभर कोरोनाचा संकट असल्याकारणाने क्रिकेट खेळाडूंना स्पर्धेत सहभागी होता आले नाही. शासनाने सांगितलेले सर्व नियम पाळत ही स्पर्धा शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडू असे आयोजक संदीप महाले यांनी सांगितले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी दत्तात्रय बडगु सर ,सागर अतनोरे ,अक्षय अंजीखाने शिवा घंटे रवि बिराजदार गुरुराज पदमगोंडा विनोद गडगे यांच्यासह जय भवानी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.