येस न्युज मराठी नेटवर्क : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. पूजाने आत्महत्या केली नाही तर ती चक्कर येऊन पडली, असा जबाब पूजासोबत असलेल्या दोघांनी दिल्याची माहिती मिळत आहे. इतकच नाही तर रुममध्ये वाईनच्या वाटल्याही सापडल्याची माहिती मिळत आहे. वानवडी पोलिसांनी अरुण राठोड आणि विलास चव्हाण यांचा जबाब नोंदवला आहे. या जबाबानुसार आता पूजा चव्हाण प्रकरणाला नवं वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान पूजा चव्हाण प्रकरणावरुन सध्या जोरदार राजकारण सुरु आहे. या प्रकरणात शिवसेनेच मंत्री संजय राठोड यांचंही नाव घेतलं जात आहे. त्यामुळे भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. तर शिवसेनेचे नेते मात्र याबाबत अधिक स्पष्टपणे बोलताना दिसत नाहीत. या पार्श्वभूमीवर आता पूजा चव्हाण प्रकरणात धक्कादायक खुलासा समोर आलाय. पूजा चव्हाणने आत्महत्या केली नाही तर ती चक्कर येऊन पडल्याचा जबाब पूजासोबत असलेल्या दोघांनी पोलिसांना दिल्याची माहिती मिळत आहे.