येस न्युज मराठी नेटवर्क ; सोलापूर येथील बालाजी अमाईन्स उद्योगाने नुकत्याच संपलेल्या तिमाहीमध्ये महसुलात 366 कोटी रुपयांची वाढ केली आहे. गेल्या नऊ महिन्यात या कंपनीने 863 कोटींची उलाढाल केली असल्याचे बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांनी सांगितले. पाश्चिमात्य देशांनी चायना- प्लस वन धोरण अवलंबले यामुळे भारतातील फार्मा उद्योग सतत वाढत असल्याने आमची उत्पादने बाजार य बाजाराच्या मागणीप्रमाणे सातत्याने वाढल्याचे राम रेड्डी यांनी सांगितले .बालाजी अमाईन्स कंपनी मर्फोलीन आणि उपकंपनी च्या माध्यमातून पीडीए तसेच डीइटीए ही उत्पादने चीनला निर्यात करत आहे. ही उत्पादने पूर्वी भारत चीन कडून आयात करत होता. बालाजी अमाईन्सने 20 ते 22 च्या मध्यापर्यंत डाय मेथिलकार्बोनेटचे उत्पादन सुरू करण्याचा संकल्प केला आहे .सध्या या कंपनीचा व्यवसाय दर महिन्याला साडेबारा कोटी रुपये होत असल्याचे रेड्डी यांनी स्पष्ट केले.