सोलापूर:- येथील पद्मशाली शिक्षण संस्था संचलित जनाबाई जनार्दन बिटला माध्यमिक शाळेतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्थाना कै.श्रावणी सनतकुमार इप्पलपल्ली यांच्या स्मरणार्थ लेखन पॅड वाटप कार्यक्रम पद्मशाली शिक्षण संस्थेचे विश्वस्त तथा एस.के.फाऊंडेशन चे अध्यक्ष अँड.श्रीनिवास कटकूर यांच्या अध्यक्षतेखाली , देणगीदार सनतकुमार इप्पलपल्ली , राजमोगली इप्पलपल्ली , सुधीर सोमा, मयुरेश इप्पलपल्ली,व्यंकटेश सोमा , एस.के.फाऊंडेशन चे सचिव यशवंत इंदापुरे आणि शाळेचे मुख्याध्यापिका शारदा गोरट्याल यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
प्रथम मान्यवराच्या शुभहस्ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना लेखन पॅड वाटप करण्यांत आले.शाळेच्या वतीने सर्व मान्यवरांना रोपे देऊन सन्मान करण्यांत आले.यावेळी सनतकुमार ईप्पलपल्ली यांनी विदयार्थिंना जास्त अभ्यास करुन जीवनात यशस्वी होण्याचे मंञ दिला. यशवंत इंदापुरे यांनी मार्गदर्शन भाषणांत लेखन पॅड मुळे परीक्षेत गुणवत्तेत नक्कीच वाढ होईल. असे सांगून देणगीदार कुटूंबियाचे आभार मानले.अध्यक्षीय भाषणांत अँड. श्रीनिवास कटकूर यांनी आता गुणवत्ता वाढीसाठी जास्तीत जास्त अभ्यास करावे .अभ्यास करताना काही अडचण शंका असल्यास मुख्याध्यापिका गोरट्याल मॅडम यांचेशी चर्चा करून अडचण किंवा शंका दूर करून घ्यावे.शाळेचा मागील सात वर्षापासून 100 टक्के आहे, यापुढेही निकाल 100 लागेल असा विश्वास व्यक्त करून सर्व गुरूजनांचे अभिनंदन केले.
देणगीदार कुटूंबियांचे कौतुक केले. असेच सहकार्य यापुढे देण्याचे आवाहन केले.या कार्यक्रमास सरगम सर, पुप्पल सर, हेमलता चिलवेरी, अविनाश आडम आदी शिक्षक वृंद आणि शाळेतील विद्यार्थ्थी , शिक्षकेत्तर सेवक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अभिज भानप यांनी केले तर आभार यशवंत इंदापुरे यांनी मांडले.