येस न्युज मराठी नेटवर्क : अक्कलकोट तहसील कार्यालय अंतर्गत 10 फेब्रुवारीपर्यंत 2018 नोंदी निर्गत करण्यात आल्या असून डिजिटल इंडिया भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम यशस्वीपणे राबवण्यात आला आहे .हे कामकाज अक्कलकोटच्या तहसीलदार अंजली मरोड यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मंडळ अधिकारी व तलाठी यांनी यशस्वीरित्या पार पाडले आहे .1 फेब्रुवारी रोजी बावीसशे चार फेरफार नोंदी प्रलंबित होत्या. त्यापैकी 2018 नोंदी 10 फेब्रुवारीपर्यंत म्हणजे अवघ्या दहा दिवसात निर्गत करण्यात यश मिळाले आहे .अक्कलकोट तालुक्यातील सर्व नागरिकांनी त्यांचे सातबारा उतारे घ्यावेत असे आवाहन आता तहसीलदार मरोड यांनी केले आहे.