येस न्युज मराठी नेटवर्क । करोनाच्या संकटाबरोबरच राज्यावर आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्याच्या तिजोरीवर या आर्थिक वर्षात मोठा भार पडला असून, एक लाख १४ हजार कोटी रुपयांची आर्थिक तूट यावर्षी आली आहे. तरीही शेतकरी कर्जमाफी, नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना नुकसान भरपाई, करोनावरील उपाययोजनांवरील खर्च, आमदार निधी यासाठी राज्य सरकारने खर्च करण्यास हात मागे घेतला नाही. त्यामुळे पुढील दोन महिन्यांत सर्वच विभागांनी काटकसर करावी, असे राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी बुधवारी राज्याच्या वित्तीय स्थितीबद्दल सादरीकरण करताना राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगितले.