येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूरातुन सतत होणारे तरुणांचे स्थलांतर, व्यवसाय आणि नोकरींची कमतरता आणि मॅग्नेटिक महाराष्ट्र मध्ये सोलापूरला नसलेले स्थान याचा परिणाम सोलापूरच्या प्रगती मध्ये होत आहे. स्वातंत्र्यपूर्व ते १९७० सालापर्यंत सोलापूर शहर आणि जिल्हा महाराष्ट्रात अव्वल स्थानावर होते. १९९० च्या दशकात जशी तंत्रज्ञान क्षेत्रात अमुलाग्र क्रांती झाली तसे सोलापूरचे तरुण नोकरी आणि व्यवसाया निमित्त कायमस्वरूपी स्थलांतरीत झाले.
केंद्र सरकारच्या नागरी उड्डयन मंत्रालयाच्या उडान योजने अंतर्गत सोलापूरला दोन वेळा प्राधान्य देण्यात आले. होटगी रोड विमानतळ सर्वसोयींनी उत्कृष्ट असूनही नागरी विमानसेवा सुरू नसल्याने सोलापूरचे आजतागायत अब्जावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. सोलापूर विकास मंचच्या वतीने हॉटेल ऐश्वर्या येथे आयोजित बैठकीत सोलापूरकरांनी सोलापूरच्या विकासाशी निगडित महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा केली.
होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवेस प्रशासनाच्या वतीने होणार्या विलंबाबद्दल सोलापूरकरांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. श्री.सिध्देश्वर सह. साखर कारखान्याची को जनरेशनची अनाधिकृत बेकायदेशीर चिमणी पाडकामाविषयी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने होणाऱ्या चालढकल बद्दल सोलापूरकर रोष व्यक्त करत आहेत. बुधवार दिनांक १७ फेब्रुवारी २०२१ रोजी सोलापूर महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारा समोर सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने अनाधिकृत बेकायदेशीर चिमणी पाडकामाविषयी होणाऱ्या दिरंगाईबद्दल सोलापूर विकास मंचासहित सोलापूरच्या इतर सामाजिक संस्था आणि व्यक्ती धरणे आंदोलन करणार असलेल्याचे सदर बैठकीत ठरले आहे.
सोलापूर विकास मंचच्या वतीने बोलवण्यात आलेल्या बैठकीत कार्यकारणी सदस्य मंडळाची नियुक्ती आणि सहमती सर्वानुमते मंजूर करण्यात आली. येणाऱ्या काळात सोलापूरच्या विकासाशी निगडित महत्त्वपूर्ण विषयांची सुयोग्य पद्धतीने हाताळणी सदर कार्यकारणी मंडळ करेल. बैठकीचे प्रस्ताविक योगीन गुर्जर यांनी केले, बैठकीत केतनभाई शहा, श्रीनिवास वैद्य, आनंद पाटील, मिलिंद भोसले, प्रसन्न नाझरे, मनिष गांगजी, डॉ. संदीप अडकी, रोहित कलशेट्टी, भास्कर नडीमेटला, धनराज बगले, संपत धुत, गिरिराज जाकोटिया, प्रतिक खंडागळे, सागर दिंडें, शरद केंगार, डॉ. जगदीशचंद्र कुलकर्णी, चंद्रकांत ईश्वरकट्टी, आनंद हुलगेरी, अनंत कुलकर्णी, मनिष जाधवानी, डॉ.सुरेश खमितकर, किसन रिकीबे उपस्थित होते. बैठकीचे सुत्रसंचालन अॅड. प्रमोद शहा यांनी केले तर विजय कुंदन जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.