येस न्युज मराठी नेटवर्क : लोकमंगल पतसंस्थेच्या सरव्यवस्थापिका अलका देवडकर यांनी लोकमंगलचे संस्थापक व मार्गदर्शक आ. सुभाष देशमुख यांची सदिच्छा भेट घेतली. सत्काराच्या सामान्य पद्धतीला छेद देत त्यांनी लोकमंगलच्या अन्नपूर्णा योजनेसाठी देणगी स्वरूप चेक देऊन एक नवा आदर्श उभा केला आहे. निराधार ज्येष्ठ नागरिकांना दोन वेळचे सकस भोजन पुरविणाऱ्या या योजनेसाठी त्यांनी केलेली मदत ही निश्चितच प्रेरणादायी आहे.