येस न्युज मराठी नेटवर्क : ‘भावनाविवश होण्यासारखे अनेक प्रसंग आज देशात घडत आहेत. काश्मिरात हल्ले होताहेत. सीमेवर जवान शहीद होत आहेत. ताजा प्रश्न शेतकऱ्यांच्या आंदोलनाच आहे. शेतकरी थंडीवाऱ्यात कुडकुडत आहेत. अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. राज्यकर्त्यांच्या डोळ्यांतून अश्रूचा महापूर यावा अशी ही परिस्थिती आहे. केवळ मोदीच नव्हे, तर संपूर्ण सरकारनंच आपल्या अश्रूंनी शेतकऱ्यांचे पाय धुवायला हवेत.
पण त्या आंदोलनाची थट्टा केली जातेय,’ याबद्दल संजय राऊत यांनी आश्चर्य व्यक्त केले.महागाई व अन्य मुद्द्यांवरून राऊत यांनी यावेळी सरकारवर टीका केली. देशात पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसचे दर गगनाला भिडले आहेत याबद्दल कोणी अश्रू ढाळताना दिसत नसल्याचं निदर्शनास आणताच संजय राऊत म्हणाले, ‘महागाई, भ्रष्टाचार, कायदा-सुव्यवस्था यावर जनतेनं अश्रू ढाळायचे असतात. लॉकडाऊन, नोटबंदीमुळं अनेक लोकांचे रोजगार गेले. शेकडो लोक जीवानिशी गेले. ह्या सगळ्यावर जनतेनं अश्रू ढाळायचे,असेही राऊत यांनी स्पष्ट केले.