येस न्युज मराठी नेटवर्क : मुस्लिम मुलगी अल्पवयीन असली तरी देखील तिचा निकाह वैध आहे, असं पंजाब आणि हरयाणा हायकोर्टानं म्हटलं आहे. प्रेमविवाह केलेल्या एका मुस्लिम दाम्पत्याच्या सुरक्षेशी संबंधीत याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने ही टिपण्णी केली आहे. हे दाम्पत्य पंजाबच्या मोहाली येथील रहिवासी आहे.
यातील तरुणाचं वय ३६ वर्षे आहे तर मुलीचं वय १७ वर्षे आहे. मुलीच्या कुटुंबियांनी म्हटलं की, मुलगी अल्पवयीन असल्यामुळे तिला आमच्याकडे सोपवण्यात यावं.या याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टानं म्हटलं की, “मुस्लीम प्रेमविवाहासंदर्भात मुलीनं प्रौढ असणं गरजेचं नाही. जर मुलगी समजदार आहे, म्हणून तिला आपला जोडीदार निवडायचा अधिकार आहे. संविधानानेच तिला स्वतंत्ररित्या आणि आवडता जोडीदार निवडण्याचा अधिकार दिला आहे. त्याचबरोबर हायकोर्टाने मोहालीच्या पोलीस अधीक्षकांना आदेश दिला की, त्यांनी या मुस्लिम दाम्पत्याच्या सुरक्षेचा आढावा घेत त्यांना सुरक्षा प्रदान करावी.