येस न्युज मराठी नेटवर्क : लडाख पूर्व भागात दादागिरी करणाऱ्या चिनी लष्कर सातत्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा भागात युद्ध सराव करत असल्याचे समोर आले आहे. नुकतेच चिनी लष्कराने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील रुटोग काउंटीमध्ये युद्ध सराव केला आहे. चिनी सैन्याने रणगाड्यांसह सराव केला असल्याचे व्हिडिओत समोर आले आहे.
या युद्ध सरावात एकाच वेळी अनेक रणगाड्यांनी मारा केल्यामुळे हा परिसर हादरून गेला. युद्ध सराव सुरू असलेल्या भागातील डोंगर बर्फाछादित आहेत. त्यामुळे हा युद्धसराव नुकताच करण्यात आला असल्याचे समजले जाते. चिनी सैन्याने काराकोरमच्या डोंगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर घातक टँक तैनात केले आहेत. ग्लोबल टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार चीनने जवळपास पाच हजार मीटर उंचावर हे रणगाडे तैनात केले आहेत.