INDvsENG : पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाविरुद्ध दणदणीत विजय मिळवला आहे. टीम इंडियाचा 227 धावांनी पराभव झाला आहे, चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. चौथ्या डावात टीम इंडियाला विजयासाठी 420 धावांची आवश्यकता होती. मात्र भारतीय संघ 192 धावांवपर्यंत मजल मारु शकला.

चेन्नई कसोटीत लाजिरवाना पराभव पत्करावा लागला आहे. भारताने पहिला कसोटी सामना 227 धावांनी गमावला. 420 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा संपूर्ण संघ 192 धावांवर बाद झाला. कर्णधार कोहलीने भारताकडून सर्वाधिक 72 धावा केल्या. शुभमन गिल 50 धावा केल्या. इंग्लंडकडून जॅक लीचने 4, जेम्स अँडरसनने 3, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर आणि डॉम बाईसने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
अश्विनची कमाल गोलंदाजी
पहिल्या डावात 578 धावांचा डोंगर उभारणाऱ्या इंग्लंडला दुसऱ्या डावात रोखण्यात टीम इंडियाला यश आलं होतं. मात्र अश्विनच्या गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडच्या संघाला टीम इंडियाने 178 धावांवर रोखलं. अश्विननं रोरी बर्न्स, डॉमनिक सिब्ले, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर आणि जेम्स अँडरसन यांना बाद केलं. कसोटी क्रिकेटच्या कारकिर्दीत त्यानं 28व्या वेळेस पाचपेक्षाही जास्त गडी बाद करण्याची कमाल केली. शिवाय कसोटी क्रिकेटच्या एकाच डावात सर्वाधिक पाच गडी बाद करणारा तो जगातील आठवा गोलंदाज ठरला आहे.