येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी वडापूर बंधाऱ्यातून तिसरी पाइपलाइन टाकण्यासाठी तातडीने मंजुरी द्यावी ,अशी मागणी महेश कोठे यांनी केली आहे सोलापूर शहराला टाकळी येथून होणारी पाणीपुरवठ्याची पाईपलाईन 1968 असल्याने खूपच जुनी झाली आहे.भविष्यात सोलापूर शहराला व्यवस्थित पाणी पुरवठा करणे अशक्य असल्याचे कोठे यांनी म्हटले आहे .उजनी धरणातून शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी आवर्तन कमी करायचे असेल तर वडापुर बंधाऱ्यातून पाणी पुरवठ्यासाठी पाईपलाईन टाकण्यात शिवाय दुसरा मार्ग सध्यातरी उपलब्ध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.