चेन्नई : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटीतील तिसर्या सत्राचा खेळाला सुरुवात झाली आहे. इंग्लंडने 250 धावांचा टप्पा ओलंडला आहे. कर्णधार जो रूटचा शानदार फॉर्म भारताविरुद्धही कायम आहे. रुटने आपले शतक पूर्ण केले आहे. तसेच रुट आणि डोमिनिक सिबले ही जोडी शतकी भागीदारीच्या दिशेने आगेकूच करत आहे. त्यामुळे ही जोडी तोडण्याचे आव्हान टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर आहे.
कर्णधार जो रुटचे शानदार शतक
इंग्लंडचा कर्णधार जो रुटने आपल्या 100 व्या सामन्यात शानदार शतक लगावले आहेत. रुटच्या कसोटी कारकिर्दीतील हे 20 वं शतक ठरलं आहे. इंग्लंडचा संघ अडचणीत असताना निर्णायक क्षणी त्याने डोमिनिक सिबलेसह महत्वपूर्ण भागीदारी केली.