येस न्युज मराठी नेटवर्क : चीन अथवा पाकिस्तान विरुद्ध लढायचे असेल तर आम्ही तुमच्या सोबतच आहोत ,असे सांगत काँग्रेसचे गुलाम नबी आझाद यांनी केंद्र सरकारवर टीका केली. शेतकऱ्यांविरोधात सरकारने युद्ध पुकारले आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला .तीनही कृषी कायदे रद्द करण्याची विनंती त्यांनी सरकारला केली आहे .लाल किल्ला परिसरात 26 जानेवारी रोजी जे घडले त्याचा आम्ही निषेध करीत आहोत. परंतु जे निष्पाप आंदोलक शेतकरी आहेत त्यांच्या विरुद्ध खोटे गुन्हे दाखल करू नका, असे आवाहनही त्यांनी केले आहे. लोकसभेत बुधवारी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार दर्शक ठराव संमत करण्यासाठी चर्चा होत आहे.