येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर जिल्ह्याचा मंगळवार दिनांक 25 मे रोजी चा covid-19 चा अहवाल प्राप्त झाला असून नव्याने ९२४ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सोमवारी रात्री बारा वाजेपर्यंत संपलेल्या चोवीस तासात कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी परतलेल्या बाकी त्यांची संख्या ३१८८ आहे या कालावधीत २२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू ओढवला आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या तालुकानिहाय आढावा घेतला असता सर्वाधिक नवीन रुग्ण माळशिरस तालुक्यात २३७ असल्याचे स्पष्ट झाले आहे. बार्शी तालुक्यात १३२, माढा तालुक्यात १०९, पंढरपूर तालुक्यात १२० आणि सांगोला तालुक्यात १०५ नवीन रुग्ण आढळले आहेत.