येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले पार्क स्टेडियम अर्थात इंदिरा गांधी स्टेडियम सुधारण्यासाठी सोलापूर स्मार्ट सिटी योजनेने आजवर आठ कोटी खर्च केले आहेत. क्रिकेटचे हे मैदान स्पर्धेसाठी सज्ज झाले आहे मात्र याठिकाणी क्रिकेटचे सामने होणार का मोठा प्रश्न आहे. असे असताना पुन्हा स्मार्ट सिटी योजनेतून स्टेडियम सुधारण्यासाठी साडेनऊ कोटी खर्च केला जाणार आहे. स्मार्ट सिटीने नुकतेच या कामाचे टेंडर प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे मैदानावर महापालिका जवळपास २० कोटी रुपये खर्च करत आहे. क्रिकेटचे सामने न झाल्यास आर्थिक अडचणीत सापडलेल्या सोलापूर महापालिकेला हे मैदान मेटेंन करणं म्हणजे पांढरा हत्ती पोसल्यासारखे आहे. त्यामुळे शहराला गरज असणारी आणि महापालिकेला भविष्यात देखभाल दुरुस्तीसाठी पेलवणारीच कामे महापालिकेने करावी असाच येस न्युज मराठीचा सल्ला