येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर जिल्ह्यातील covid-19 चा बुधवार दिनांक २६ मे रोजी चा अहवाल प्राप्त झाला असून नव्याने ८४८ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. मंगळवारी रात्री १२ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासात १२३६ व्यक्ती कोरोना मुक्त होऊन रुग्णालयातून घरी परतल्या आहेत. या कालावधीत २३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू ओढवला आहे. नवीन कोरोना बाधितांचा तालुकानिहाय आढावा घेतला असता, बार्शी तालुक्यात ११२, करमाळा तालुक्यात ११८, माढा तालुक्यात १०२ , माळशिरस तालुक्यात १३३ आणि पंढरपूर तालुक्यात १६३ व्यक्तींना नव्याने कोरोनाची बाधा झाली आहे. अक्कलकोट, बार्शी, मंगळवेढा, मोहोळ, उत्तर सोलापूर, सांगोला आणि दक्षिण सोलापूर या सहा तालुक्यात १०० पेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत.