मंगळवेढा – आरोग्यसेवा आयुक्तालय , महाराष्ट्र राज्य यांच्याकडून शासकीय आरोग्य संस्था श्रेणीवर्धन व बांधकामासाठी आशिया विकास बँक यांच्यामार्फत प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या निर्मितीसाठी ८ कोटी ४० लाख रुपयाच्या निधीस मंजूरी मिळाल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली.
मंगळवेढा तालुक्यातील कचरेवाडी , अकोला , सलगर खुर्द , सोड्डी , येड्राव , कात्राळ , खोमनाळ या गावांकरिता नविन प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला प्रत्येकी १ कोटी २० लाख प्रमाणे निधी मंजूर झाला आहे .
यामध्ये आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे बांधकाम करणे , उपकरणे , यंत्रसामुग्री , वीज , पाणी आदी बाबीचा समावेश आहे , सदरचा निधी आशिया विकास बँकेकडून ७० टक्के व राज्या शासनाकडून ३० टक्के इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे.
मंगळवेढा तालुक्यातील ७ प्राथमिक अरोग्य उपकेंद्राला मंजूर आनुदान प्राप्त करण्यासाठी उपकेंद्राचे अंदाज व आराखडे शासनाकडे सादर करणे क्रमप्राप्त असून या अंदाज व आराखडयामध्ये मुख्य इमारत , निवास व्यवस्था , फर्निचर साहित्य सामुग्री , वीज , पाणी , कंपाऊंड , अंतर्गत रस्ते, या सर्व बाबीचा समावेश असावा असे नमूद केले आहे.
यासाठी आमदार प्रशांत परिचारक, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, समाज कल्याणच्या माजी सभापती सौ. शिलाताई शिवशरण, जिल्हा परिषद सदस्या सौ. मंजुळा कोळेकर, पंचायत समितीच्या सभापती सौ. प्रेरणा मासाळ, उपसभापती सुर्यकांत ढोणे, माजी सभापती प्रदिप खांडेकर, माजी उपसभापती सौ. विमल पाटील, पंचायत समितीच्या सदस्या सौ. उज्वला मस्के आदिनी पाठपुरावा केला होता .