सुरक्षा रक्षक, कर्माचारी, अधिकाऱ्यांनी दिली राष्ट्रध्वजास मानवंदना
सोलापूर – सोलापूर स्थित प्रिसिजन कॅमशाफ्ट लिमिटेड कंपनीमध्ये देशाचा ७८वा स्वतंत्र दिन उत्सहात साजरा करण्यात आला. प्रिसिजन कंपनीमध्ये काम करणारे सुरक्षा रक्षक हे माजी सैनिक आहेत. या माजी सैनिंकांनी तिरंगा झेंड्यास परेड करून मानवंदना दिली.
स्वातंत्र दिनाच्या या कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून कंपनीचे एच आर विभागाचे जनरल मॅनेजर राजकुमार काशीद हे उपस्थित होते. झेंडावंदनानंतर राजकुमार काशीद यांनी उपस्थित कर्मचारी यांना मार्गदर्शन केले. देशभक्त क्रांतिकारणकांच्या बलिदानामुले आपल्यला हे स्वतंत्र मिळाले आहे, हेय बलिदान व्यर्थ ना जाओ, असे त्यांनी आपल्या मनोगतात आपल्या भावना व्यक्त केल्या.
आज देशाला प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाण्यासाठी शिस्त, सामाजिक स्वच्छता व मेहनत करणे गरजेचे आहे असे हि ते पुढे म्हणले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव देशपांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन संदीप पिसके यांनी मानले. कर्यक्रमास कंपनीतील अधिकारी, कर्मचारी, महिला कर्मचारी तसेच सुरक्षा रक्षक हे उपस्थित होते.