सोलापूर : शहर व ग्रामीणसाठी बुधवारी ७५१ रेमडेसिविर इंजेक्शन प्राप्त झाले. यामध्ये शहरासाठी २३३ इंजेक्शनचा समावेश आहे. रुग्णालयाच्या मागणीनुसार जिल्हा प्रशासनाकडून हे इंजेक्शन्स पुरवण्यात येत आहेत. सोलापूर शहरातील उमा मेडिकल ७, सम्राट डिस्ट्रिब्यूटर्स ५०, मार्कंडेय मेडिकल ४८, नर्मदा हॉस्पिटल ४८, मोनार्क मेडिकल २०, आपटे एजन्सी बार्शी ६०, याप्रमाणे इंजेक्शन्स पुरवण्यात आली आहेत. ग्रामीणमध्ये बार्शी ७२, उत्तर सोलापूर ०३, दक्षिण सोलापूर १०, अक्कलकोट ०३, पंढरपूर ७२, सांगोला २३, मंगळवेढा १०, माळशिरस ५०, माढा २४, करमाळा १८ इंजेक्शन्स देण्यात आली आहेत. डॉक्टरांच्या मागणीनुसार संबंधित रुग्णालयातील रुग्णाला इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात येत आहेत. थेट रुग्णाच्या नातेवाइकांनी इंजेक्शनची मागणी करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.