डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे आज सोलापूर शहरामध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे. शहरांमधील 12 मोठे मार्ग व 43 शासकीय कार्यालये; त्यामध्ये सोलापूर महानगरपालिका, जिल्हा परिषद कार्यालय, कलेक्टर कार्यालय, आरटीओ ऑफिस, पोलीस स्टेशन, सिव्हिल हॉस्पिटल, विमा हॉस्पिटल, जिल्हा न्यायालय, कौटुंबिक न्यायालय इत्यादी शासकीय कार्यालयामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे.
सदर मोहिमेत 7500 दास (सेवाधारी) सहभागी झाले होते. मोहिमेमध्ये त्या ठिकाणचा कचरा, कागद, प्लास्टिक, वाळलेले गवत, झाडपाला इत्यादी स्वरूपातील कचरा काढून कार्यालय व मार्ग स्वच्छता करून वाहनातून मनपाच्या मुख्य कचरा डेपोकडे पाठवण्यात आले आहे. याकरिता प्रतिष्ठानतर्फे आलेल्या सेवाधारीकडून 55 ट्रॅक्टर, २ डंपर कार्यरत होते. तसेच मनपाकडून 66 घंटागाड्या, 6 RC वाहन, 5 डंपर होते. मनपाकडून 40 आरोग्य निरीक्षक, 8 मुख्य आरोग्य निरीक्षक, 1 सफाई अधीक्षक यांनी यासाठी सहकार्य केले.
कचरा संकलनाच्या वाहनावर नियंत्रण ठेवून कचरा मुख्य डेपोकडे पाठवण्यात आले आहे. स्वच्छता मोहीम दरम्यान संकलन करण्यात आलेला एकूण कचरा 80.265 टन आहे अशी माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली.