सोलापूर : निराळे वस्ती येथील जय भोलेनाथ मित्र मंडळाने गुरुवारी शिवराज्याभिषेक दिनी रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या रक्तदान शिबिरात ७५ जणांनी रक्तदान केले. प्रारंभी अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी क्रांती तालीमचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सपाटे,मोहन चटके, प्रकाश शिंदे,बळीराम जांभळे यांच्यासह जय भोलेनाथ मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

रक्तदान शिबिर आयोजित करण्यासाठी मंडळाच्या राहुल काळे, नितेश भोसले, अमोल सुरवसे, साईनाथ ताटे, सागर चव्हाण, प्रदीप झांबरे, अभिजीत मगर, अवधूत फुलवाडे, ऋषिकेश झांबरे, सचिन भोसले, सारंग सुरवसे, रोहन येळणे, रोहित शिंदे, विश्वनाथ लांडगे, रामेश्वर लांडगे, गोविंद ताटे आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.