सोलापूर : दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघाचे आ.सुभाष देशमुख हे आपले वाढदिवस सहसा साजरा करीत नाहीत.परंतु या वर्षी कार्यकर्त्याच्या आग्रहास्तव त्यांनी त्यांची 63 वे वाढदिवस कार्यकर्त्यांना साजरा करण्याची संमती दिली,परंतु एका अटीवर आपण माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पुष्पगुच्छ,शाल श्रीफळ याकरिता खर्च करण्यापेक्षा लोकमंगल समूहाच्या वतीने गोरगरिबांसाठी चालू असलेल्या अन्नपूर्णा योजनेमध्ये आपल्याला जमेल तेवढे अन्नदान करा असे आवाहन केले .त्यांच्या या सूचनेनुसार प्रभाग क्रमांक 24 च्या नगरसेविका अश्विनी चव्हाण यांनी 75 किलो तांदूळ देऊन या उपक्रमामध्ये सहभागी झाल्या.तसेच अन्नपूर्णा योजनेतून गोरगरिबांना देण्यात येणारे डब्यांची पूजा नगरसेविका अश्विनी ताई चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी शहाजी पवार,व अविनाश महागावकर,मोहन राठोड ,व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.