नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत शेतकरी आंदोलनाला 70 दिवस झाले आहे. नवीन कृषी कायदा मागे घेण्याच्या भूमिकेवर शेतकरी ठाम आहेत. तर दुसरीकडे या मुद्यावरुन संसदेत देखील मोठा गदारोळ सुरु आहे. विरोधी पक्षांकडून या मुद्यावर आज जोरदार गोंधळ घातला जाण्याची शक्यता आहे. विरोधी पक्ष संसदेत स्थगन प्रस्ताव आणण्याची मागणी करत आहे. काल देखील दोन्ही सभागृहात जोरदार गोंधळानंतर कामकाज स्थगित करण्यात आले होते. दिल्लीच्या सिंघु, टिकरी आणि गाजीपूर सीमेवर शेतकरी जिथं आंदोलन करत आहेत त्या ठिकाणी सीमेंटचे अवरोधक, अनकुचिदार तारा, रस्त्यांवर खिळे लावण्यात आले आहेत, सोबतच मोठ्या संख्येने पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, यावरुन विरोधी पक्षाने संसदेत जोरदार हल्लाबोल केला.