सांगली; सांगली जिल्हा पोलीस दलाच्या सायबर विभागाने नुकतीच एक ऑनलाईन फसवणुकीच्या तक्रारीवरून संशयिताचे विविध २० बँकेच्या खात्यातील तब्ब्ल ७ कोटी ८१ लाख रु गोठवल्याची कामगिरी केली आहे. अधिक माहिती अशी जिल्ह्यातील इस्लामपूर येथील हर्षवर्धन विश्वास पाटील याना संशयित सागर अंकुश माने( वय २९ रा इंदोर सध्या भाईंदर) आणि अशोक महावीर आचार्य (वय २९, रा अजमेर राजस्थान सध्या भाईंदर पूर्व ठाणे) तर तिसरा आणि या टोळीचा मुख्य सूत्रधार संशयित फरारी असून या तिघानी टेलिग्राम या ऍप वर कॅपिटॅलिक्स कंपनीकडून ट्रेडिंग मध्ये पैसे गुंतवल्यास जादा परतावा मिळेल असे अमिश दाखवून दि २३ ते २६ जुलै दरम्यान २२ लाख रु घेतले.
मात्र कोणताच परतावा दिला नाही त्यामुळे फिर्यादी श्री पाटील यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली लागलीच पोलीस प्रशासनाने हि बाब गांभीर्याने घेत तपस चक्रे फिरवली तपासाअंती संशयितांची २० बँकांमध्ये खाती असून अशा प्रकारे पैसे या खात्यांमध्ये भरले जात असल्याची बाब समोर आली तर या बँकांमधील खात्यामधील तब्ब्ल ७ कोटी ८१ लाख रु गोठवण्यात आले या टोळीपैकी दोघांना तातडीने अटक केली असून या टोळी विरोधात जुहू परिसरातही पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.
सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ बसवराज तेली, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तुषार पाटील, उपाधीक्षक मंगेश चव्हाण, यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल चव्हाण सायबर चे निरीक्षक संजय हारुगडे, हवालदार गणेश झानजरे, अरुण कानडे आणि यांच्या टीम ने हा तपास केला आहे.