अँटिंगा : वेस्ट इंडिजचा आक्रमक अष्टपैलू खेळाडू आपल्या तडाखेदार फलंदाजीसाठी ओळखला जातो. पोलार्डने आपल्या या तडाखेदार फलंदाजीचं दर्शन श्रीलंका विरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यामध्ये घडवले. पोलार्डने या सामन्यात 6 चेंडूत 6 सिक्स ठोकण्याचा पराक्रम केला आहे. यासह पोलार्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तिसरा तर टी 20 मधील दुसरा फलंदाज ठरला आहे.
पोलार्डने श्रीलंकेच्या अकिला धनंजयाच्या बोलिंगवर 6 चेंडूत 6 गगनचुंबी सिक्स खेचले. यासह पोलार्डने युवराज सिंह आणि हर्षल गिब्सच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. युवराज सिंहने 2007 मध्ये इंग्लंड विरुद्धच्या टी 20 सामन्यात ही खेळी केली होती. तर हर्षल गिब्सने नेदरलंड विरुद्ध 50 ओव्हरच्या सामन्यात हा कारनामा केला होता.