मुंबई : ६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत सोलापूर केंद्रातून अखिल भाविक वारकरी सांप्रादायिक मंडळ, सोलापूर या संस्थेच्या विक्रमाचा घातांक क्ष या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच अनघ नाट्य मंदिर, सोलापूर या संस्थेच्या ती रात्र या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी आज एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे सोलापूर केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे-
श्रुती मंदिर, सोलापूर या संस्थेच्या एका उत्तराची कहाणी या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. दिग्दर्शनः प्रथम पारितोषिक अमोल देशमुख (नाटक- विक्रमाचा घातांक क्ष), द्वितीय पारितोषिक राजेश जाधव (नाटक- एका उत्तराची कहाणी), प्रकाश योजनाः प्रथम पारितोषिक श्याम चव्हाण (नाटक-ती रात्र), द्वितीय पारितोषिक उमेश बटाणे (नाटक- विक्रमाचा घातांक क्ष), नेपथ्यः प्रथम पारितोषिक अमोल देशमुख (नाटक- विक्रमाचा घातांक क्ष), द्वितीय पारितोषिक बाळकृष्ण निमसूडकर (नाटक-भयरात्र), रंगभूषाः प्रथम पारितोषिक नमिता देशमुख (नाटक- विक्रमाचा घातांक क्ष), द्वितीय पारितोषिक रमेश श्रावण (नाटक-ती रात्र) उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक ऋतुराज आरसिद (नाटक-दुभंगून जाता जाता) व अश्विनी तडवळकर (नाटक- ती रात्र), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे अपर्णा जोशी (नाटक- एका उत्तराची कहाणी), सुनंदा शेंडगे (नाटक-लपून छपून), सई दरेकर (नाटक-मोनालिसा), अर्चना सलवारु (नाटक- शरदातले चांदणे), श्रीनिवास देशपांडे (नाटक-ती रात्र), कुबेर शास्त्री (नाटक- विक्रमाचा घातांक क्ष), अरविंद माने (नाटक-शरदातले चांदणे), अशोक किल्लेदार (नाटक- लपून छपून)
दि. २५ नोव्हेंबर, २०२४ ते १० डिसेंबर, २०२४ या कालावधीत हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण १४ नाट्य प्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री. रामकृष्ण पार्टे, श्री. रमेश भीडे आणि डॉ. कुंदा प्रमिला नीळकंठ यांनी काम पाहिले.
सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. विकास खारगे यांनी पारितोषिक प्राप्त संघांचे तसेच इतर पारितोषिक प्राप्त कलाकारांचे अभिनंदन केले असून भविष्यातही या संघांनी व कलाकारांनी सर्वोत्तम कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे.