सोलापूर : एसबीआय साक्ष शाखेच्या एटीएम सेंटरमधून कार्डचा लबाडीने वापर करून सहा लाख तीस हजार रुपये लबाडीने चोरून नेल्याची फिर्याद बँकेचे शाखाधिकारी काशिनाथ बिराजदार यांनी जेलरोड पोलिस ठाण्यात केली आहे . एसबीआय बँकेच्या औद्योगिक शाखेनजिकच्या एटीएम सेंटरमधील कॅश डिपॉझिट मशीन आणि रिसायकलर् मशीनच्या पासवर्डचा किंवा हार्डवेअर वैशिष्ट्यांचा लबाडीने वापर करून कार्ड धारकाने कार्ड चा ६३ वेळा वापर केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी जेलरोड पोलिस ठाण्याचे पोलिस सबइन्स्पेक्टर भादुले अधिक तपास करीत आहेत.