येस न्युज मराठी नेटवर्क : अहमदनगरमधील कोपरगाव तालुक्यात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. कंटेनरची रिक्षाला धडक बसल्याने ही दुर्देवी घटना घडली आहे. मृतांमध्ये दोन महिला, २ पुरुष तर २ महाविद्यालयीन विद्यार्थिनींचा समावेश आहे.
कोपरगाव तालुक्यातील मुंबई-नागपूर महामार्गावर शुक्रवारी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान कंटेरनर क्रमांक पी बी ०५ एबी ४००६ या कंटेनरने समोरुन येणाऱ्या मोटारसायकलला कट मारुन प्रवाशी वाहतुक करणाऱ्या रिक्षा क्रमांक एम एच १७ ए जे ९०५६ हिला जोराची धडक दिल्याने रिक्षामधील ६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर रिक्षातील प्रवाशांसह मोटारसायकल वरील तिघं असे ७ जण जखमी झाले आहेत.
मृतांमध्ये १) राजाबाई साहेबराव खरात वय ६० वर्षे रा. चांदेकसारे, ता कोपरगाव २) आत्माराम जम्मानसा नाकोडे वय ६५ वर्षे रा. वावी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक ३) शैला शिवाजी खरात वय ४२ वर्षे रा.श्रीरामपुर ४ ) शिवाजी मारुती खरात वय ५२ रा. श्रीरामपूर, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी ५) पुजा नानासाहेब गायकवाड वय २० वर्षे रा. हिंगणवेढे, ६) प्रगती मधुकर होन वय २० वर्षे रा. चांदेकसारे, तालुका कोपरगाव यांचा समावेश आहे.