सोलापूर, दि.13 : जिल्ह्यातील सहा औद्योगिक कंपन्यातील 531 रिक्त पदांची भरती करण्यासाठी 25,26 आणि 27 ऑगस्ट 2021 रोजी ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांनी मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे प्रभारी सहायक आयुक्त हणमंत नलावडे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता आहे. उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी पात्रता दहावी उत्तीर्ण/अनुतीर्ण, बारावी, डिप्लोमा, पदवीधर, पदवीव्युत्तर पदवी अशी आहे.
या मेळाव्यात ट्रेनी, वेल्डर, फिटर, इलेक्ट्रिशियन, विमा सल्लागार, नर्सिंग, 10 वी पास/नापास, 12 वी, डिप्लोमा,पदवीधर,पदवीव्युत्तर पदवी अशा प्रकारची पदे उद्योजकांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अधिसूचित केली आहेत. उमेदवारांच्या मुलाखती व्हिडीओ कॉन्फरन्स किंवा फोनद्वारे ऑनलाईन घेण्यात येणार आहेत.
इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेनुसार https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करून रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी 0217-2950956 या दूरध्वनीवर किंवा [email protected] या इमेलवर संपर्क साधावा, असे आवाहन नलावडे यांनी केले आहे