७४ जण कोरोनामुक्त, दोघांचा कोरोनामुळे मृत्यू
सोलापूर : शहराचा covid-19 चा २७ मे रोजी चा अहवाल प्राप्त झाला आहे. बुधवारी रात्री १२ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासात सोलापूर शहरांमध्ये नव्याने ५२ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे . या कालावधीत ७४ जण कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत. २४ तासात दोघांचा कोरोनामुळे मृत्यू ओढवला आहे. प्रभागनिहाय कोरोना बाधितांचा आढावा घेतला असता प्रभाग क्रमांक २६ मध्ये सर्वाधिक ८ जणांना तर प्रभाग क्रमांक २५ मध्ये ६ आणि प्रभाग क्रमांक २४ मध्ये ५ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.