देशातील बहुतांश ठिकाणचा उसाचा गळीत हंगाम संपत आला आहे. काही ठिकाणीच उसाचे गाळप सध्या सुरु आहे. दरम्यान, ऊस कारखान्याला गेल्यानंतर 14 दिवसांच्या आता शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले पाहिजेत असा नियम. त्याप्रमाणे बहुतांश कारखान्यांनी शेतकऱ्यांची देणी दिली आहे. तर काही कारखान्यांनकडे अद्यापही देणी बाकी आहेत. दरम्यान, आत्तापर्यंत 16 हजार कोटी रुपयांची देणी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहेत. देशातील साडेपाच कोटी कुटुंबांना याचा फायदा झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यात 5000 कोटी रुपयांची देणी देण्यात आली आहेत.
कोणत्या राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना किती पैसे दिले?
उत्तर प्रदेश- 6,500 कोटी
कर्नाटक – 3,000 कोटी
महाराष्ट्र – 5,000 कोटी
इतर राज्ये – 2,000 कोटी