राज्यात शिंदे फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यापासूनचा पहिला अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडणार आहेत. राज्याचे अर्थमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस पहिला अर्थसंकल्प मांडतील. त्यामुळे या अर्थसंकल्पाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पुढील वर्षातील निवडणूका पाहता अर्थसंकल्पातून मोठमोठ्या घोषणा होण्याची शक्यता असली तरीही राज्याची आर्थिक परिस्थिती फार चांगली नसल्याचं काल जाहीर झालेल्या आर्थिक पाहणी अहवालातून समोर आलं आहे.
गुलाबराव पाटील म्हणाले, नागालँड ओके; अजित पवार भडकले
गुलाबराव पाटील यांनी नागालँड ओके झालंय का? असा प्रश्न विचारताच विरोधी पक्षनेते अजित पवार भडकले.
अजित पवार म्हणाले की आज सरकार, सर्व यंत्रणा त्यांच्या ताब्यात आहे. त्यांनी चौकशी करावी. त्याऐवजी असे आरोप करणे चुकीचे आहे. ईशान्येतील परिस्थिती वेगळी आहे. त्यानुसार निर्णय घेतले जातात. त्यावर बोलून इथे काहीच फायदा नाही. असं उत्तर अजित पवार यांनी दिल.
‘५० खोके, नागालँड ओके झालंय का ?” गुलाबराव पाटील यांचा आरोप
नागालँड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला आहे. त्यावर शिंदे गटाचे गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. गुलाबराव पाटील म्हणाले मागील काही दिवसापासून देशात बदलाचे वारे वाहत आहेत. नागालँड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजप पुरस्कृत सरकारला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे नागालँड मध्ये ५० खोके विषय झाला आहे का ? असा प्रश्न विचारला. ‘५० खोके, नागालँड ओके झालंय का ?” गुलाबराव पाटील यांनी आरोप केला.