कोलंबो : एकीकडे विराट कोहलीच्या नेतृत्त्वातील टीम इंडिया पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडमध्ये आहे. तर दुसरीकडे शिखर धवनच्या नेतृत्त्वातील भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर आहे. इंग्लंडमध्ये चार ऑगस्टपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. तर त्याआधी श्रीलंका दौऱ्यात वन डे आणि टी 20 मालिका होत आहे. भारताचे दोन्ही मुख्य संघ दोन वेगवेगळ्या दौऱ्यावर आहेत. मात्र श्रीलंकेतील काही माजी खेळाडू हे भारताने मुख्य संघ न पाठवल्याने नाराज आहे.
अशा परिस्थितीत श्रीलंका क्रिकेट बोर्डातील वाद समोर आला आहे. पाच खेळाडूंनी या मालिकेत खेळण्यास नकार दिला आहे. एकीकडे भारतीय संघ शिखर धवनच्या नेतृत्वात आणि राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली तयारीला लागल आहे. तर दुसरीकडे श्रीलंका संघातील वाद उफाळून आला आहे.