विहीर ढासळल्याने पोहायला गेलेले 5 जण बुडाले, दोघांना सुखरुप बाहेर काढले
दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावात विहिर ढासळल्याने दोघे ढीघाऱ्याखाली अडकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.


उन्हाळ्याच्या गर्मीपासून बचाव करुन पोहण्याचा आनंद घेण्यासाठी बोरमणी गावातील जवळपास 5 ते 6 मुलं एका शेतातील विहीरीत पोहण्यासाठी गेले होते
विहिरीत ही मुले पोहोत असताना अचानक दगडी विहीर ढासळल्याने ही मुले विहिरीत अडकली, ग्रामस्थांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ विहिरीकडे धाव घेतली.
ग्रामस्थांनी लालगीच विहिरीकडे धाव घेतली आणि पोलीस प्रशासनाला देखील माहिती देण्यात आली. त्यानंतर, ग्रामस्थांच्या मदतीने तिघांना विहिरीतून बाहेर काढण्यात आलं आहे. विहिरीत उतरलेली दोन मुले अद्यापही विहिरीतच अडकली आहेत,दरम्यान अग्निशमन दल आणि पोलिसांकडून या मुलांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.