येस न्युज मराठी नेटवर्क : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर झालेल्या भीषण अपघात पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर पाच जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये नवी मुंबईतील एकाच कुटुंबातील चार जणांचा समावेश आहे. मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर खालापूर टोलनजीक फुडमॉलजवळ मध्यरात्री हा भीषण अपघात झाला. कंटेनर ट्रेलर, इनोव्हा कार, क्रेटा कार, टेम्पो, ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. अपघातात पाचही गाड्यांचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.
दरम्यान , या अपघातात नवी मुंबईतील डॉक्टर वैभव झुंजारे यांची आई, पत्नी आणि 5 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. डाॅ. वैभव झुंजारे नवी मुंबई महानगरपालिकेत पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. जखमींपैकी दोघांना पनवेल, दोघांना वाशी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातातील मृतांची नावे
- मंजू प्रकाश नाहर, वय 58 वर्ष, गोरेगाव पश्चिम
- डॉ. वैभव वसंत झुंझारे, वय 41 वर्ष, नेरुळ, नवी मुंबई
- उषा वसंत झुंझारे, वय 63 वर्ष, नेरुळ, नवी मुंबई
- वैशाली वैभव झुंझारे, वय 38 वर्ष, नेरुळ, नवी मुंबई
- श्रीया वैभव झुंझारे, वय 5 वर्ष, नेरुळ, नवी मुंबई