सोलापूर – राज्य शासनाच्या ग्रामविकास निधी (२५/१५) अंतर्गत सोलापूर लोकसभा मतदार संघात ५ कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर झाला आहे. यामुळे सोलापूर लोकसभा क्षेत्रातील गावात अनेक विकासकामे मार्गी लागणार असल्याची माहिती खा. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींनी दिली.
या योजनेअंतर्गत गावात व्यायामासाठी जिम साहित्य देणे, मंदिर परिसरात सभामंडप बांधणे, गाव परिसरात फुटपाथ करणे व दुर्तफा LED लाईट बसविणे, अंतर्गत सिमेंट रस्ता करणे, पेव्हर ब्लॉक बसविणे, जिल्हा परिषद शाळा वर्ग खोल्या बांधणे, गावअंतर्गत सिमेंट रस्ता करणे, स्मशानभूमी संरक्षण भिंत करणे, मंदिर परिसर सुशोभिकरण करणे अशा स्वरूपाच्या विविध कामांना मंजुरी मिळाली आहे.
अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, पंढरपूर, उत्तर सोलापूर, मंगळवेढा या तालुक्यातील गावांना विकासनिधी मिळाल्याने अनेक प्रलंबित कामे लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती खा.डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींनी दिली आहे.