सोलापूर : जिल्ह्याचा covid-19 चा मंगळवार दिनांक सहा जुलैचा अहवाल प्राप्त झाला आहे. सोमवारी रात्री १२ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यामध्ये नवीन ४५४ लोकांना कोरोना ची बाधा झाली आहे. या कालावधीत २५२ व्यक्ती कोरोनामुक्त होऊन घरी परतल्या आहेत . सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू ओढवला आहे . कोरोना बाधितांचा तालुकानिहाय आढावा घेतला असता सर्वाधिक १५५ व्यक्तींना माळशिरस तालुक्यात नव्याने कोरोनाची बाधा झाली आहे. पंढरपूर तालुक्यात ९४ व सांगोला तालुक्यात ८४ जणांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यात सर्वात कमी म्हणजे फक्त एका व्यक्तीस कोरोनाची बाधा झाली आहे. म्यूकरमायकोसिस चे नवीन चार रुग्ण आढळले आहेत. सध्या या आजाराने ग्रस्त असलेल्या ८५ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार चालू आहेत.