सोलापूर : स्क्वेअर वन कॉम्प्लेक्सच्या तळमजल्यावर मोटार सायकल लावली असताना डिग्गी उचकटून अज्ञात चोरट्याने पर्समधील ४० हजार रुपयांची १२ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, अठराशे रुपये रोख असा ४१ हजार ५०० रुपयांचा माल चोरून नेला आहे. याप्रकरणी दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोड्डी येथील मीरा अंकुश पाटील यांनी जेलरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलीस हवालदार शेख अधिक तपास करीत आहेत.