येस न्युज नेटवर्क : जवरेह सोली पुनावाला यांच्या मालकीच्या 41.64 कोटी रुपयांची चार मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. फेमा कायद्यानुसार ईडीने ही कारवाई केली असून पूनावाला यांच्या मालकीच्या सीजे हाऊस, वरळी, मुंबई येथे असलेल्या तीन स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत. जवरेह सोली पुनावाला हे पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटचे संचालक असून त्यांचं नाव पनामा पेपर्समध्ये आलं होतं.
अंमलबजावणी संचालनालयाने सोमवारी झवरेह सोली पूनावाला आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांची चौकशी केली होती. त्यातून मिळालेल्या माहितीनुसार, फेमाच्या तरतुदींनुसार 41.64 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. जवरेह सोली पूनावाला आणि त्यांच्या कुटुंबाविरुद्ध FEMA च्या तरतुदींनुसार लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीम च्या गैरवापराच्या प्रकरणाची ईडी चौकशी करत आहे. त्यामुळे त्यांच्याकडे असलेल्या भारतातील मालमत्तांच्या समतुल्य मूल्याच्या FEMA च्या कलम 37A च्या तरतुदींनुसार जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे