आमदार सुभाष देशमुख यांची माहिती
सोलापूर (प्रतिनिधी)
सामाजिक न्याय व सहाय्यक विशेष विभागाकडून दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत सुमारे 4 कोटी 35 लाखांचा निधी प्राप्त झाल्याची माहिती आमदार सुभाष देशमुख यांनी दिली. आ. सुभाष देशमुख यांनी याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता. आ. देशमुख यांनी दहा कोटी रुपयांची मागणी केली होती मात्र पहिल्या टप्प्यात चार कोटी पस्तीस लाखांचा निधी विधानसभा मतदारसंघ करिता मंजूर झाला आहे.
निधी मिळालेल्या कामात दोड्डी वस्ती येथे दलित वस्तीत व्यायाम शाळा बांधणे, बरूर येथे पाणीपुरवठा सोय करणे बाणेगाव मागासवर्गीय स्मशानभूमी कडे जाणारा रस्ता कॉंक्रीटीकरण करणे, कारकल दलित वस्ती स्मशानभूमीत बॉल कंपाऊड करणे, गुजेगावमध्ये समाज मंदिरापर्यंत पेव्हर बसविणे, चिंचपूर भिमनगर येथे अंतर्गत सिमेंट कॉंक्रीट रस्ता करणे, दिंडूर येथे डॉ. बाबासाहेब आंबडेकर नगर येथे पेव्हर ब्लॉक बसविणे, कुंभारी दलित वस्तीत सिमेंट रोड करणे, हत्तरस.