श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या ३७५ व्या बिजोत्सव निमित्त सोलापुरातील अशोक चौक येथील श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज मंदिर येथे सकाळी १० ते १२ ह.भ.प विष्णुपंत महाराज मोरे यांचे गुलालाचे किर्तन पार पडले. त्यानंतर दुपारी तीन महाप्रसाद वाटप करण्यात आला.
तुकाराम महाराज बीज सोहळा निमित्त जगद्गुरु तुकाराम महाराज मंदिर या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. ९ मार्चपासून १६ मार्चपर्यंत हा सप्ताह करण्यात आला. यामध्ये रोज विविध महाराज मंडळींची कीर्तन तसेच भजनी मंडळांचा हरी जागर संपन्न झाला.
या संपूर्ण सोहळ्यासाठी ह.भ.प चैतन्य महाराज मोरे,भगवंत महाराज मोरे, हरिहर मोरे, केशव मोरे, प्रभाकर मोरे,मुकुंद मोरे,निवृत्ती मोरे, अनिल मोरे, विकी सूर्यवंशी, किशोर मोरे, विशाल मोरे उदय मोरे, भाऊ मोरे, किशोर मोरे आदींनी परिश्रम घेतले.
